52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
1 min
289
कष्टाचे मोल जगी या
असते अनमोल फार
फिकेच सारे त्यापुढे
हाच खरा वाटे उपहार.
तळमळीने करता कष्ट
पर्वा नसते कधी कशाची
ध्येय प्राप्तीच्या ओढीने
चढतात पायरी यशाची.
आस मनाची ती सदैव
तडफडून रक्त जागवते
कार्यसिध्दीची ही जिद्द
अंतरातून मन हालवते
ध्यास स्वप्नपुर्तीचा तो
देतो सदा कष्टाला बळ
राबता मग स्व: हिंमतीने
लाभावे मधुर सुखाचे फळ.
ना कधी व्हावी अवहेलना
मेहनतीने राबणाराची
उमजून त्यांचे खरे मोल
राखावी जाणीव कष्टाची.
