52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
1 min
310
मनातील कल्पना हीच
एक कविता असते.
इतरांचे कटू अनुभव
शब्दात बांधून टाकणं
हीच एक कला असते.
मनातील भावनांना
शब्दांतून बोलतं करणं
हेच एक कौशल्य असते.
कल्पना आणि वास्तवता
यांचा एकत्र मेळ घालणं
हेच कवितेचे सार असते.
स्वप्नाचा आभास वाटणं
सत्याचा सामना करणं
हेच कवितेचे रहस्य असते.
सुख दु:खाचा परखडपणा
हाच कवितेचा गाभा असतो,
अन् नजरेनं टिपलेली पण
मनानं ती जाणून घेतलेली
हीच कवितेची भाषा असते.
कविता ही मनाचा खेळ असते
कधी कल्पना साकारली जाते
तर कधी वास्तवता मांडली जाते.
