STORYMIRROR

vanita shinde

Others

4  

vanita shinde

Others

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

1 min
395

सगळीकडे दिसतोय उठून

झगमगणारा लख्ख प्रकाश,

दिव्यांच्या रांगा वाटती जणू

चांदण्यानी भरलेले आकाश.


आम्ही तर आहे अनाथ 

परिस्थितीने रांजलेले,

मस्त मजेत जगणं नाही

दिवाळीतही गांजलेले.


कुणाच्या तरी आधारावर

वाट पाहात जगायचं,

येईल कुणी तरी वाली

या आशेवरच राहायचं.


खूप वाटतं मनाला असं की

दिवाळीत मनसोक्त खायचं,

गोडधोड पक्वनांचा आस्वाद

घेऊन आनंदाने नाचायचं.


पण नशिब किती घेते

जीवघेणी सत्व परिक्षा,

क्षणाक्षणाला लागे ठेच

दिवाळीतही मागतो भिक्षा.


नाही शिरावर मायेचे छत्र

ना प्रेमाचा पाठीवर हात,

आम्हा अनाथांना तर

दिवाळीतही अंधारी रात.


गोड खावे अन् नवे कपडे 

सर्वांनी हसत अंगात ल्यावे,

आमच्या माथी दिवाळीतही

हृदयी जळती अंधारी दिवे.


चौफेर घुमतो फटाक्यांचा

धरणी दुमदुमणारा नाद,

आम्ही मात्र टक लावून

दुरूनच घेत राहतो आस्वाद.


सांगा मिळेल का कधी तरी

आम्हा अनांथा अशी दिवाळी?

जी जाळून टाकेल आमच्या

जीवनातील दारिद्रयाची होळी.


Rate this content
Log in