५२ आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेस
५२ आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेस
1 min
173
मनाच्या कुपित असतं
बरंच काहीसं लपलेलं,
आयुष्याच्या हर क्षणांना
नाजुक स्पर्शानं जपलेलं.
टिपुन घेत सुख- दु:ख
हृदयी ठसती आठवणी,
शब्दांच्या गर्भात रुजती
अनुभवातील साठवणी.
भाव मनात सलताना
उठते रक्त सळसळून,
उफाळतो हृदयी अथांग
शब्द सागर खवळून.
बोल अबोल रुजलेले
घेती शब्दातून आकार,
शब्द सुरांनी बहरते
सुंदर लेखणी दमदार.
शब्दांच्या गर्भातून उमलती
सुख दु:खांचे बीज निर्मळ
काव्य रुपातून अंकुरती
भाव अंतरीचे सोज्वळ.
