31 मार्च
31 मार्च
ही कोरोन्टाईन। सकाळ उशाशी।
करे मखलाशी।आपोआप।।
म्हणे आर्जवाने।झोप तू निवांत।
करू नको खंत।जगताची।।
आपल्या परीने।काळजी घेईल।
सुखात राहील।गपचूप।।
जो तो रे हुशार।जाणतो कोरोना।।
नको रे भावना।मध्ये आणू।।
धर्म जात पंथ।नाहीच जाणत।
पक्की तू मनात।ठेव जाण।।
आता रे बाहेर।पडू नको बाबा।
घेई बघ ताबा।कोरोनाच।।
वेळ भयंकर।पुढ्यात ठाकली।
आशा ही सुकली।जगण्याची।।
तरी धीर धरी।नको करू काही।
सारून रे बाही।आता काही।।
आताच सांगतो।घरातच रहा।
हवे तेच पहा।आंनदाने।।
खा पि रे सकस।गरमा गरम।
नको रे शरम।कशाचीही।।
माझे मी जपेन।इतुकेच म्हण।
तुझ्या साठी कोण।नाहीच रे।।
स्वतःची काळजी।स्वतःच घ्यायची।
कामाला द्यायची।एक लाथ।।
विश्रांती सुरेख।मनसोक्त घेई।
नाही काही घायी।कामाची रे।
कोरोना साखळी।तुटेल क्षणात।
सांगतो कानात।परमेश्वर।।
