31 मार्च
31 मार्च
1 min
358
सहाव्या दिवसाची संध्याकाळ...!
पश्चिमेला तो नजरेआड झाला
तशी त्याच्यासह नभात
ती दिसू लागली
म्हटले कालच्यापेक्षा
अंतर जरा
आज चांगलेच वाढले...
तशी ती
विरह ग्रासीता म्हणाली
थोडे दिवस असेच चालणार
जरा जास्तच लांब लांब
व्हावे लागणार
तो ही दुरून हसला
म्हणाला
चलता है
विरह से प्यार
बढता है
इतक्यात गाणे आठवले
कही दूर जब दिन ढल जाये
पाठोपाठ
रुक जाना नही
तू कही हार के
काटोंपे चल के
मिलेंगे साये बहार के....!
इतक्यात अंधारून आले
म्हटले सहावा दिवस संपला...
