STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

30 मार्च

30 मार्च

1 min
383

सहाव्या दिवसाची सांगता

एक वेगळाच विचार घेऊन झाली

साऱ्यांच्या दातृत्वाची जेंव्हा

झोपता झोपता जाण झाली...

प्रत्येक जण आपापल्या परीने

देशसेवेचे व्रत सांभाळतो

कोण वैयक्तिक माणसी वर्गणी सुचवितो

तर कोणी दानवीरांचे कौतुक मांडतो...

संस्था कामगार वर्ग,मध्यमवर्गीय

सारे सारे सेवे करी

फुल ना फुलाची पाकळी जमा करतात

कठीण प्रसंगी देशासाठी उपयोगी पडतात...

म्हणून वाटते जनप्रतिनिधींनी पण

आपणहुन वैयक्तिक खारीचा वाटा उचलावा

खासदारांनी दहा लाखाचा तर

आमदारांनी पाच लाखाचा सहभाग द्यावा...

पंतप्रधान निधीत भर थोडी घालतील

तर जनता त्यांना आजच डोक्यावर घेईल

कोरोनाच्या उच्चाटनासाठी तरी निदान

त्यांच्या सत्पात्रीदानाचा उपयोग होईल...

क्षणभर का होईना झोपी जातांना

वाटते मनस्वी समाधान मिळेल

म्हटले कोरोनामुळे तरी निदान आमच्या

आमदार खासदारांचे दातृत्व कळेल...!


Rate this content
Log in