२६ जानेवारी...
२६ जानेवारी...
२६ जानेवारी १९५०
सगळ्या भारतीयांसाठी दिवस तो खास...
पूर्ण स्वराज्य मिळालं त्या दिवशी...
प्रजासत्ताक नावाने गणला तो दिवस दाही दिशी...
७० वर्ष पूर्ण गेली...
भारताच्या इतिहासात मुख्य दिवसात नोंद झाली...
तिरंगा फडकावला जातो गगनी...
आपली देशाची राजधानी असते नटलेली...
आपल्या एकतेचे आणि संस्कृतीचे चित्र उभे केले जाते...
देशाच्या प्रधानमंत्रीचेही मनोगत देशवासीयांसाठी सादर केले जाते...
प्रत्येक राज्य आपल्या चित्ररथाबरोबर देशाची मान उंचावते...
आपले सैनिकही शिस्तप्रिय कवायत करतात
आपले अस्त्र शस्त्र दाखवून आपली ताकद दुश्मनांना जाणवत...
परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रण असते
आपल्या देशाची शान अधिक उंचावते...
पाणवता डोळे जेव्हा मेडल दिले जाते...
देशासाठी लढत असलेल्या शौर्यासाठी तर कधी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांसाठी...
