2020 शुभेच्छा!
2020 शुभेच्छा!
1 min
160
आता एवढंच करा
झालं गेलं गंगेला मिळालं म्हणा
आणि हातात हात घेऊन
बेईमानांना चांगलाच दणका हाणा....
वाटलंच मला
भलतंच मनात आलं असणार
ध चा मा लगेचच
क्षणात झाला असणार....
पण
अर्थ जरा समजून घ्या
थोडे मनालाही आता
उमजून घ्या...
नवीन वर्षाची सुरुवात
अविचारांना दणका देऊन होऊ दे
मला वाटते नववर्षात
प्रेमाचे जीवन इथे पुन्हा नांदू दे....!
