15 ऑगस्ट स्वातंत्र दिवस
15 ऑगस्ट स्वातंत्र दिवस
भारतमाता की जय
तो आवाज होता
भारत स्वातंत्र्य होण्यासाठी
लढणाऱ्या शहीदांचा
रक्तात साचलेल्या अन
थारोळ्यात पडलेल्या वीर पुत्रांचा
कधी होता तुरुंगवास तर
कधी कधी घडे उपवास
कधी काळ्या पाण्याची शिक्षा
तर कधी घरच्या प्रेमळ शब्दांची चिठ्ठीद्वारे प्रतिक्षा।
कधी बोबड्या बोलाचा कानात भास।
तर कधी नववधूला भेटण्याची आस।
कधी म्हताऱ्या आईला भेटण्यासाठी आसुसलेले डोळे
तर कधी आनंदाच्या बातमीचे निशब्द ते सोहळे।
तरी कधी मानली नाही हार
लढत राहिले जीवावर होऊन उदार।
गोळ्यांचा निधड्या छातीवर होतसे भडीमार।
तरी मायभू स्वातंत्र्यतेसाठी घेतले कष्ट अपार।
गुलामगिरीतून भारत देश स्वातंत्र्य करून दिला भारतीयांना
आपल्या सगळ्यांचे त्रिवार वंदन शहीदांना
आपल्या सगळ्यांचे त्रिवार वंदन शाहीदांना
