STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

स्वप्नातही माझ्या

स्वप्नातही माझ्या

1 min
153

कळी फुलवून चौफेरी, खरी तू आतही माझ्या

झुले बघ गंध आयुष्या, जरा देठातही माझ्या...


किती मुक्काम वादाशी, करावे लागता रडले

सदा आशा धरायाची, बरी स्वप्नातही माझ्या.....


तुझा वाडा सुना होता, गरज होती भरवला तू

दयेचा अर्ज का फेटाळला ताब्यातही माझ्या....


 किती राबून चटके सोसले मी या गरीबीचे

मला ना आसरा तुझिया,दिल्या शापातही माझ्या...


कधीही अंतरी शांती, दिसाया लागता कळते

कधी आलीच नाही ती, घडी लाभातही माझ्या...


सुखाला शोधण्यासाठी , किती पूजा पठण केली

कलश भरले पहाटेला, अटी भाग्यातही माझ्या...


करी बेचैन मजला सांजवेळी गारवा सजणा

तुझा संदेश येण्याचा वसा आत्म्यातही माझ्या.....



Rate this content
Log in