STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Children Stories Inspirational

4  

Anjali Bhalshankar

Children Stories Inspirational

गदगदलेले स्वर.... .....

गदगदलेले स्वर.... .....

5 mins
307

घरात आई शाळेत बाई दोघेही आपापल्या कसोटीवर मुलांना, विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी चांगले संस्कार शिक्षण देण्यासाठी व मानसिक, शैक्षणिक, भावनिक व सामाजिक विकास विकास वाढविण्यात मोलाची महत्वाची भूमिका बजावतात.थॅंक्स टीचर्स तर आपण सार्या टिचर्स,स ना म्हणतोच मात्र काही शिक्षक असतात जे अंतर्मनात निवास करतात त्याचे स्थान अबाधित रहाते, आठवणिने सुद्धा डोळ्याच्या कडा ओलावतात आणि मन पुन्हा लहाणपणा कडे शाळेकडे धाव घेते. एक प्रदीर्घ काळ ओलांडून आपण जीवनात पुढे आलेलो असतो हदयातून मात्र आजही शाळेच्या शिक्षकांच्या प्रतिमा घट्ट रुतलेल्या असतात. माझ्या बाबतीत सांगायचेच तर शिक्षक व शाळेचा विषय निघाला की आमचे वर्गशिक्षक श्रीयुत कुलकर्णी सर यांची ठेंगणी गोरीपान धारधार नाक चेहेरयावर स्मितहास्य असलेली प्रतिमा क्षणात समोर तरळते. तसे तर सारेच शिक्षकांनी कच्च्या पक्क्या शालेय वयातील जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेय यात शंकाच नाही. मात्र कुलकर्णी सरांचे माझी मुलगी आहे ती विद्यार्थिनी असे टिचर्स रूम मधला संवाद कुणाकडून तरी ऐकुन मनाला सुखावून जाई त्यासह जबाबदारीची जाणीव व काहीही झाले तरी सरांच्या नजरेत कायम गुणी विद्यार्थिनी बनुन रहायचेय हा विचार पक्का दृढ व्हायचा. सरांनी आपल्या शिक्षणाची जबाबदारी उचलली ते शैक्षणिक पालक आहेत मग आपणही आपले कर्तव्य पार पाडायचेच असा निर्धार केला. दहावीचे वर्ष!शेवटचे शैक्षणिक वर्ष म्हणून टिळक रोडवरील आमची अशोक विद्यालय शाळेने निसर्गरम्य अशा महाबळेश्वरला ट्रीप काढली.मात्र दोनशे पन्नास रूपये फी देण्याची ऐपत नसल्याने ट्रीप विषयी जादा चर्चा करण्यात अर्थच नव्हता दोन दिवस अगोदर ट्रिपचे पैसे जमा केलेल्या मुलांसाठी विशेष सुचना द्यायला हॉलमध्ये जमायला सांगितले.त्याप्रमाणेच माझ्या वर्गातील सर्वच विद्यार्थी व विद्यार्थिनी हॉलमध्ये गेले. शेवटचे वर्ष असल्याने जवळपास माझ्यासारखी वा जराशी बरी परीस्थिती असलेल्या सर्वच मुलामुलींनी सहलीला जायचे पक्के केले कोणी कसे पैसे जमविले,आईपुढे कीती विनवण्या, व हट्ट केले मग कसेबसे पैसे जमवून दिले वगैरे चर्चा वर्गात व्हायची. मला माझ्या आई वडिलांना हट्टाने रडून कुठूनही पैसे द्या म्हणण्याची हिम्मत झालीच नाही.नको जायला सहलीला नाही गेलो तर त्या दिवसभर छान अभ्यास करूया असे ठरविले होते. म्हणुनच सर्व मुले हॉलमध्ये गेली असताना मी एकटीच वर्गात अभ्यास करीत बसले. खरेतर मनातून दुःखी होते मी माझ्या सर्व मैत्रीणी,पहाटे कीती वाजता ऊठायचे जेवण काय घ्यायचे, सोबत कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या पैसे कीती घ्यायचे तिथली स्पेशल जेली चॉकलेट व स्ट्रॉबेरी आणायची कूणी कुठे बसायचे.गाण्याच्या भेंड्या खेळायच्या बस स्टार्ट झाली की कोणत्या घोषणा द्यायच्या शिक्षकासाठी सुद्धा काहीतरी स्पेशल पदार्थ बनवून आणायचा... ट्रिपचे समजल्यापासून मधल्या सुट्टीत व ऑफ तासाला सर्व मैत्रीणी मध्ये याच चर्चा रंगु लागलेल्या. आज तर शेवटची सुचना व मुदतही पैसे भरण्याची संपणार.दोन दिवसांनी सर्व जण ट्रिपला जाणार. मला मात्र........असे विचार व आठवणीने मन अभ्यासात थोडेच रमणार...........बँचवर डोके ठेऊन मी जवळपास डोळ्याच्या कडेवर बोहेर यायला अगदीच ऊतावीळ होऊन कठोकाठ भरून आलेल्या अश्रुंना प्रयासाने थोपवून धरले व शांत पणे पडुन  पंधरावीस मिनिटे गेली असावीत मी तशीच बँचवर डोक ठेऊन स्वस्थ पडलेले डोक्यात मात्र विचाराचे काहुर ऊठलेले. का?आपल्याच वाटयाला..हे.मलाही ट्रीप ला जायला मिळाले असते तर मी पण इतर मुलींसारखी जरा तरी बर्या पंधराव्या वर्षाच्या बुद्धीच्या तर्कानुसार रोजच्यारोज डबे आणणाऱ्या, शाळेची फी वर्षभरात कवर करणार्या इस्त्री चा गणवेश घालणाऱ्या मधुन मधुन पाच दहा रूपये खाऊसाठी आणणाऱ्या, शाळेत काही योजना व कार्यक्रमासाठी किंवा अवांतर वाचनाचे पुस्तक वगैरे घेणयासाठी दहावीस रूपये जमा करावयास सांगितले आसता एकदोन दिवसात तत्परतेने जमा करणार्या व अधूनमधून वर्गशिक्षकांना भेटायला येणारे पालक माझ्या नजरेत श्रीमंत होते.आणि माझी खंत त्यांच्या पोटी जन्माला न आल्याची .अशा सगळ्या विचारात गुंग डोके बँचवर टेकलेले आणि डोळ्याचे तळे काठोकाठ भरलेले इतक्यात दोनतीन जणींचा माझ्याच वर्ग मैत्रीणींचा आवाज आणि मागाहुन आमचे वर्गशिक्षक श्रीयुत कुलकर्णी सरांचा कुठे आहे ती ते बघा सर असे संमिश्र आवाज ऐकुन मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येऊन जरासे वर डोके उचलले. तर माझे गुरूवर्य सोबतच्या मुलींनी तोवर मला वेढले. मग काय झाली का तयारी अंजली ट्रिपला यायचेय ना? पण.........सर पूढे मला बोलु न देता सरच बोलले पैसे कधीच भरलेत राजा मी, शेवटचे वर्ष आहे. मस्त ट्रीप एंजोय करायची तु माझी विद्यार्थ्यांनी आहेस तुझ्याकडून मला खुप अपेक्षा आहेत बोर्डाच्या परीक्षेत खुप मेहनत घ्यायचीय मग त्यासाठी थोडा आनंद व मन फ्रेश असायला हवे की नाही? सोबतच्या सर्व मुली एकदम हो...अशा जवळपास किंचाळल्याच. पण मला काय झाले कूणास ठाऊक ईतके दिवस व मघापासून सहलीचे पैसे भरण्याची परीस्थिती नाही म्हणून श्रीमंत अर्थात त्यावेळेच्या वातावरण व परीस्थितीनुसार विचाराच्या कुवतीनुसार,आईवडिलांच्या पोटी जन्मले नाही म्हणून झूरणारी मी खरंतर आनंदाने ऊसळायला हवे होते पण मला काय झाले कुणास ठाऊक मी सरळ सरांकडे पाहुन निर्धाराने बोलले नाही सर नको मला नाही यायचे ट्रिपला.कारण तआधिच तुम्ही माझा सर्व खर्च म्हणजे वह्या पुस्तके फी वगैरे भरत आहात आणखीन सहलीचे पैसे ही भरणे मला नाही योग्य वाटत खरंतर मला लाज वाटतीये तूम्ही माझ्या वर विश्वास ठेवला सर्व वर्गावर निर्धाराने सांगता माझी पोरगीच पहीली येणार शाळेत आणि जर उद्या मी पहीली नाही आले तर मला तुम्हाला तोंड दाखवायची पण लाज वाटेल म्हणून सर नको मला नाही यायचे ट्रिपला, मी अभ्यास करेन दिवसभर सरांनी शांतपणे माझे एका दमात बोलणे एकुन घेतले.मग डोक्यावरून हळुवार पणे हात फिरवला आणि कधीचे गालावर ओघळत असलेले अश्रू पुसायला सांगितले. एकीला टिचर्स रूममधून पाणि आणायला पिटाळलं  ठीक आहे नाही यायचे ना!हरकत नाही मात्र मी गमतीने मुलांना पहील्या नंबरचे बोलत असतो. तु जास्त तान घेऊ नको त्या गोष्टीचा तु माझ्या वर्गातीलच काय या शाळेतली हुषार विद्यार्थिनी आहेस.आणि मलाच नाही आपल्या संपूर्ण शिक्षकांना तुझ्याकडून अपेक्षा आहेत आणि तुझे परीश्रम त्या गोष्टीची ग्वाही देतात. तशा तर सर्वच विद्यार्थिनीवर आम्ही सर्व शिक्षक तेव्हढेच माया व प्रेम करतो पण काही परीस्थितीने गांजलेली हुशार मुले मागे रहाता कामा नये त्यांनी शक्य तेव्हढे सहकार्य करणे आमचे कर्तव्य आहे.आपली शाळा गरीब होतकरू मुलांची आहे सर्वच शिक्षकांनी प्रत्येक वर्गातील एकदोन विद्यार्थि दत्तक घेतलेत. तु माझ्या वर्गातील होतकरू मुलगी आहेस.मी काहीही जास्त केलेल नाही जे केल ते कर्तव्य म्हणूनच बस !मी ही सरांचा शब्द न शब्द ऐकला.पुढे म्हणले तरीही सर मला खरचं नाही यायचे ट्रिपला...........खरचं मला नाही यायचे मला अजिबात वाईट नाही वाटत आहे. ठीक आहे परवा सहल आहे वाटले,मन बदलले तर बिनधास्त परवा पहाटे गणवेशात शाळेत यायचं!डोक्यावरून पुन्हा मायेने हात ठेऊन सर सर्रकन वळले मागे न पाहताच चला हॉलमध्ये या पटकन वर्गाबाहेर पडताना उच्चारलाले पुढील शब्द विरळ झाले का कुणास ठाऊक ऐकु आलेले दोन शब्द ही गदगदलेले भासले मला.............


Rate this content
Log in