गझल
गझल
1 min
1.4K
आग आत्म्यातली शांतवावी जरा
मानवी चालही थांबवावी जरा...!!
संतवाणी मनी घे भरूनी कधी
जागताना तया आठवावी जरा....!!
तारकांनो बघा हा तमस सारवा
आसमंती प्रभा दाखवावी जरा...!!
का करावी मनाशी उगा चाळनी
काव्यमय मैफिली गाजवावी जरा..!!
भोवताली असे सुखद सागर इथे
लाट फुटता मने जागवावी जरा...!!
या मनी मोहती ओढ व्यसनातही
शिकुनी आत्मबळ वाढवावी जरा...!!
देशप्रीती मनी फार ओसांडली
भारता आपल्या सावरावी जरा....!!