ऋणानुबंध
ऋणानुबंध
थंडी शरीराला जाणवत होती, आणि तरीही अंगावर पांघरायला साधी शाल ही त्या रस्त्यावर राहणाऱ्या आजोबांजवळ नव्हती. असतील एक सत्तरीतले आजोबा, ज्यांचं या जगात कोणीही नव्हतं, नातेवाईकांनी त्यांचं घर फसवून हडप केलं होतं व त्यांना घरातून हकलवून दिल होतं. एकुलता एक मुलगा तो एका अपघातामध्ये गेला होता, मुलगा गेल्याच हा धक्का सहन न झाल्याने आजोबांची बायको म्हणजेच त्या मुलाची आई गेली आणि आता आजोबा रस्त्यावर पडले होते ,एकटे पडले होते...`
संध्याकाळ ची वेळ होती, आजोबा नेहमी प्रमाणे त्यांच्या ठरलेल्या झाडाजवळ थंडीने गारठून बसले होते,अचानक समोरून एक कार आली आणि त्यातून एक माणूस उतरला,आजोबांजवळ आला, सूट बुटा वरून सभ्य आणि अतिशय चांगल्या घरातील व्यक्ती वाटत होता, तो आजोबांची अवस्था पाहून आणि त्यांची शोकांतिका ऐकून त्याने आजोबांना स्वतःच्या घरी नेलं व घरी पत्नीला व त्याच्या छोट्या मुलीला सांगितलं हे माझे काका आहेत आजपासून इथंच राहणार आहेत, पत्नीला व त्याच्या मुलीला आनंद झाला कारण त्यांना आजी आजोबा म्हणजे काय असतं हे माहितीच नव्हतं,..
आजोबा त्या माणसाला जवळ बोलवून म्हणाले ऋणानुबंध म्हणतात ते हेच का रे!
