पहिल प्रेम
पहिल प्रेम
सोनल बारावी नंतर बी.एस.सी. पुण्यात शिकायला आली. गोरी , कुरळे केस , गुलाबी ओठ अशी देखणी सोनल स्वभावाने पण गरीब आणि मनमिळाऊ होती. तिच्या या स्वभावामुळे तिला ब-याच मित्र मैत्रीणी होत्या. काही मित्र उगाचच तिच्या रुपावर भाळून मैत्री केलेले होते.सोनलला कळायच पण ती दुर्लक्ष करायची.
काॅलेजच गॅदरींग होतं. तेव्हा तिनृ एके नाटकात काम केलं होतं. तेव्हा रुपेश बरोबर ती काम करतं होती. आता रुपेशची तिच्याशी जरा जास्तच मैत्री झाली होती. नाटकाच्या सरावाच्या निमित्ताने ते जास्त वेळ एकमेकांच्या सहवासात येतं होते. नाटक संपल्यावर दोघांनाही चैन पडेना. काॅलेज मधे रोज भेट होयची. पण हाॅस्टेलवर आल्यावर सोनलच्या मनात सारखे रुपेशचे विचार यायचे. रुपेशच्या भेटीची हुरहूर असायची. तिची ही अवस्था तिच्या रुम मेटच्या अवनीच्या लक्षात आली. अवनी गाणं म्हणत तिची चेष्टा करत होती ' क्या यही प्यार है?' सोनल एकदम लाजली.
रुपेशची पण काही वेगळी अवस्था नव्हती.
रोज डे च्या आदल्या दिवशी रुपेशनी ठरवल की उद्या लाल गुलाब सोनलला देवून तिला प्रपोज करायचं.
रोज डे ला सोनल गुलाबी रंगाचा छान वनपीस घालून आली होती. एकदम छान दिसत होती. रुपेशने लाल गुलाब त्याच्या खिशात ठेवला होता. मनात वेगळीच धडधड होती. त्याने सोनल आणि अवनीला विचारल ,' काॅफी प्यायला जाऊ या का ?
दोघीही तयार झाल्या. रुपेश खुश झाला. काॅफी पिऊन झाल्यावर रुपेशने खिशातुन गुलाबाच फुल काढल आणि तिच्या समोर धरुन म्हणाला, ' I love you.
सोनल एकदम लाजली. गालावर एकदम गुलाब फुलल्यासारखे झाले, ओठांवर लाली आली. क्षणभर तिला काही सुचेना. मग तिने ते गुलाबाच फुल स्वीकारलं. दोघही खुश झाले. अवनी हळूच तिथुन निघून गेली. मग दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबूली दिली.
दोघं मग बाईकवरुन फिरायला जायचे. कधी सिनेमा बघायला जायचे.लव्ह बर्ड मजा करत होते. पण पवित्र प्रेम होतं.
हा हा म्हणता तिसर वर्ष संपायची वेळ आली. तो काॅलेजचा शेवटचा दिवस होता. दोघांनी त्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील तळ्याकाठी भेटायच ठरवलं. तिथल्या बाकावर दोघे बसले. दोघे शांत होते. आता परत लवकर भेटता येणार नव्हतं.सोनालीने रुपेशच्या खांद्यावर डोकं ठेवलं.रुपेशने तिचा हात हातात घेतला.आज प्रथमच ते इतके जवळ आले होते. रपेशने अलगद तिच्या गालावर ओठ टेकवले. सोनाली एकदम मोहरली. रुपेश म्हणाला जाताना सोबत गोड आठवण हवी ना ? सोनल एकदम लाजली. दोघांनाही हातात हात घालून तिथेच बसाव असं वाटतं होतं.पण आता निघायला हवं होतं.
सोनाली दुसर्या दिवशी गावाला घरी जाणार होती. रुपेश आता नोकरीच्या शोधात होता.
दोघांचा रीझल्ट लागला. रुपेशला डिस्टिंक्शन मिळालं होतं तर सोनालीला फर्स्ट क्लास मिळाला होता. रीझल्टच्या निमित्ताने दोघांची परत भेट झाली.
रुपेशला पुण्यातच एका कंपनीत नोकरी लागली. रुपेश उंच ,गोरा होता त्यामुळे लगेच त्याच इंप्रेशन पडायचं.एका प्रोजेक्ट साठी त्याची निवड झाली. त्याच्या बरोबर राहीची निवड झाली होती. राहीची रुपेशशी ओळख करुन दिली. राही त्याच्याकडे बघतच बसली.पहाता क्षणी तो तिला आवडला. रुपेश तिला हाय करुन निघून गेला.
पण राहीला चैन पडे ना. रात्री बेडवर आडवी पडल्यावर तिला रुपेश आठवत होता. दुसर्या दिवशी पासुन त्याच्या बरोबर काम करायला मिळणार म्हणून खुश होती.
प्रोजेक्ट चालू झाला. रुपेशच्या डोक्यात अस काही नव्हत. पण राही मात्र मधेच त्याच्याकडेच बघत रहायची. तिला चैन पडायच नाही. एक दिवशी तिने रुपेशला तिच्याबरोबर काॅफी प्यायला यायचा आग्रह केला. रुपेश काॅफी प्यायला गेला. तेवढ्यातच सोनालीचा काॅल आला. रुपेश बोलत असताना राही त्याच्याकडे बघत होती. म्हणून त्याने फोन ठेवला. राहीने विचारल कोणाचा फोन होता ? रुपेशने सांगितल की माझी काॅलेज मेट होती. काॅफी पिऊन झाल्यावर राहीला तिथे गप्पा मारत बसायच होतं पण रुपेशने निघायला हवं म्हणून उठला.जाताना राही त्याच्या बाईकवर बसली आणि तिने मागन रुपेशच्या गळ्यात हात टाकले .रुपेशला एकदम ऑकवर्ड झालं. हे काहीतरी वेगळचं प्रकरण आहे अस त्याला जाणवल.
दुस-या दिवशी दोघे प्रोजेक्ट साठी आले. पण आता रुपेशनी तिच्याशी जास्त बोलायच नाही अस ठरवल.
आठ दिवसांनी राहीने रुपेशला सांगितल ,' उदया माझा वाढदिवस आहे.तर तू बर्थ डे पार्टीला ये . '
रुपेशला वाढदिवस असल्याने तिला नाही म्हणणं बर नाही वाटलं.
राही वाढदिवसाच्या दिवशी खूप नटून पार्टी वेअर ड्रेस घालून आली होती. तिने रुपेशला प्रपोज करायच ठरवल होतं. रुपेशने तिला ग्रीटिंग नेल होतं.त्याला वाटल पार्टी म्हणजे आणखी कोण तरी असेल. पण राही एकटीच टेबलवर बसली होती. वेलकम ड्रिंक पित असतानाच सोनलचा व्हिडिओ काॅल आला.तिला कळल की हा कुठे तरी हाॅटेल मधे आहे. तिला राही पण दिसली. रोहनने सांगितल की मी नंतर तुला फोन करीन.
सोनलला राग आला. एकदम रडायलाच आलं. रुपेश बरोबर कोण तरी मुलगी होती आणि तो बोलला नाही म्हणून तिला वेगळीच शंका आली. रुपेशच दुसर प्रेम प्रकरण चालू आहे का असे वेगवेगळे विचार तिच्या डोक्यात थैमान घालू लागले. तिनी रडत रडतच अवनीला फोन केला आणि काय झालं ते सांगितल. अवनी म्हणाली ,' काॅलेज मधल प्रेम असच असतं. ते एक आकर्षण असतं.रडू नकोस. रुपेश नंतर फोन करतोय का बघ. शांत रहा.
इकडे राहीने जेवण झाल्यावर रुपेशला ,' I love you. म्हणत लाल गुलाबाच फुलं समोर केलं. '
पण रुपेश त्याच्या विचारावर ठाम होता. त्याच सोनल वरच प्रेम होतं. त्याने राहीला समजावलं. त्याने तिच्यासाठी आणलेलं पिवळ्या गुलाबाच फूल दिलं आणि म्हणाला माझ सोनलवर प्रेम आहे. मी तिला फसवणार नाही. मी एक मित्र म्हणून तुझी साथ नक्की देईन. राही नाराज झाली.
तिकडे सोनल रुपेशच्या फोनची वाट बघत होती. रुपेशने व्हिडिओ काॅल केल्यावर सोनल रडायलाच लागली. रुपेश म्हणाला , ' ए , वेडाबाई ,रडू नकोस.' मग त्याने राहीची सगळी हकीकत तिला सांगितली. मग तो तिला म्हणाला,' ते माझ पहिल प्रेम आहेस. तुझ्या शिवाय मी कोणाचाच विचार करु शकत नाही. Promise. '
आता सोनलच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सोनल म्हणाली
' तुझ्या माझ्या प्रीतीचा झरा
कायम झुळझुळत राहू दे
म्हणून आपल्या प्रेमाचा
पाऊस सतत बरसत राहू दे.'
अस म्हणत सोनलने फ्लाइंग किस दिला आणि गुड नाईट म्हणत रुपेशने ओठाने इशारा केला.
