कर्जदार
कर्जदार
1 min
307
कधीतरी सुखाचे क्षण येतील म्हणून,
मनातल्या मनात झुरत राहिलो,
दुःखी कर्जाचे ड़ोंगर उभारत राहिलो,
हसलोच असू कधीतरी
तेही दुसऱ्याच्या उधारीवर,
एक गुपित सांगू?...
सध्या ड़ोळयातल्या अश्रूंनीही
सोडून दिलय वाहणं,
कारण त्यांनाही माहित झालंय,
कर्ज हे कधी ना कधी फेड़ावेच लागते...
