शैलपुत्री चतु:श्लोकी स्तवनम्
शैलपुत्री चतु:श्लोकी स्तवनम्
आश्विन मासे मुहूर्तेच प्रतिपत्घट:स्थापना,
अर्चयेत् अखंडं दीप:सर्व भक्तांनी पूजयेत्!!१!!
प्रथमरूपे शैलपुत्री देवी तव वंदना !
वृषभं वाहना: यस्य प्रसिद्धे हिमकन्यकां !!२!!
शुभ्रवस्त्रं प्रिया देवी हस्ते त्रीशूल धारिणीम्
वाम हस्तेतु पुष्पंच कुंकूमं चंद्र शोभिणीम्!!३!!
स्वभक्तं रक्षणार्थाय नवरूपंच धारिणीम् !
दंडयेत् असुरा नित्यं भक्तां वरदायीणीम्!!४!!
इति नवरात्रौ शक्ती रूपे संतदास कृते,
शैलपुत्री चतु:श्लोकी स्तवनं हस्ते लिखित !!५!!
अर्थ :- ( हे देवी ) आश्विन महिन्यातील प्रतिपदेच्या मुहूर्तावर तुझी घट स्थापना करून सर्व भक्त्त अखंड दीप लावून तुझी अर्चना करतात....१
त्यातील तुझं प्रथम रूपं शैलपुत्री हिमालयाची कन्या वं जिचे वाहन ऋषभ असून ती म्हणून प्रसिद्ध आहे अश्या तुला माझे वंदन आहे.....२
पांढरे शुभ्र वस्त्र तुला प्रिय असून एका हातात त्रिशूळ धारण केलेला आहे आणि डाव्या हातात फुलं धारण केलेलं असून कपाळावर चंद्रकोरं कुंकू सुशोभित आहे....३
स्वभक्ताच्या रक्षणार्थ नऊ रूपे धारण केलेली आहेत.,व असूरांना दंड देणारी असून भक्तांना वरदान देणारी आहेस........४
इत्यादी शैलपुत्री चार श्लोकी स्तवन
हे संतदासांनी स्वहस्ते लिखाण केले आहे.....५
संतदास
