काळ-वेळ
काळ-वेळ
1 min
219
जन्मलास म्हणुनी जगला, काळ येता मेला
तुझ्या या जीवनी, काही अर्थ नाही राहिला
बालपण खेळण्यात, तारुण्य पळण्यात
वेळ असाच बघ निघून जात राहिला
स्वतःच्या घरी अशांती ठेवतोस
दुसऱ्याच्या घरी मात्र शांती ठेवला
आई बाबांना तू गेला विसरुनी
जाऊन बसला तू दूर देशाला
आधार होशील म्हणून जन्म तुला दिले
तू मात्र त्यांची काठीच मोडून काढला
जन्मलास म्हणुनी जगला, काळ येता मेला
तुझ्या या जीवनी, काही अर्थ नाही राहिला