कालचक्र
कालचक्र
1 min
294
दिवस आणि रात्र
चाले कालचक्र
एकामागून एक
फिरे आयुष्याचे वक्र
सुख आणि दुःख
असाच खेळी लपंडाव
सुखाचे क्षण येता
दुःख साधी आपला डाव
आयुष्य दोन घटनेत
सीमित जीवन मरणात
कालचक्र आयुष्याचे
चालत राहे संघर्षात
रात्रीत दुःखाची छाया
दिवसा आशेचा किरण
संपेल ना कधीही हा खेळ
दैवाचे हे अजब चरण
न घाबरता कालचक्रास
पाऊल पुढे चालवावे
आयुष्याच्या प्रत्येक क्षणास
आनंदाने उपभोगावे
