माहीत नाही मला
माहीत नाही मला
1 min
465
माहिती नाही मला
का तुझी एवढी आठवण येते
काहीच काम नसले तरी
नंबर तुझेच डायल करते...
समोर काय बोलावे
तेही मला ठाऊक नसते
तुझेच चार शब्द ऐकण्यासाठी
कानाला फोन लावून बसते...
ऐकू येते कानात काही
मन अगदी प्रसन्न होते
थोडक्यातच शब्द तुझे मौन होते
मग अचानक डोक्यातून
अश्रू वाहायला लागते...
दिवसरात्र वेड्यासारखे
चेक करते मी फोन
पण तुझे कुठेच प्रेमाचे शब्द
दिसत नाहीत एक किंवा दोन...
जाणून घे ना रे
माझ्या वेढ्या प्रेमाचे अर्थ
खरचं खूप जीव लावते
पण यात कसलेच
नाही आहे रे माझे स्वार्थ...
