गुणवान लेक
गुणवान लेक
1 min
117
लेक नव्हे माझी परक्याचे धन
होवो आयुष्मान सुरमयी!!१!!
चंद्रें शीतलता प्रेमाचा सागर
मायेचा पदर लेक माझी!!२!!
रत्नांची ते खान पोटी शुद्ध दान
असावी ते जाण माय बापा!!३!!
जये पोटी आले शिवाजी महान
शूर हनुमान याच जगी!!४!!
अहिल्या द्रौपदी जिजाऊ सावित्री
मुक्ताई धरित्री मंदोदरी !!५!!
संतदास म्हणे धन्य तेची लेक
रक्षीतसे एक संस्कृतीशी !!६!!
