मैत्री
मैत्री
1 min
201
दगडावरती दगड रचले ,
लगोरी खेळताना ,
हातावरती ओढण्या रेषा ,
जॉलीच्या निळ्या...!
हाक मारता नाव सोडून,
ठेवली किती नावे ,
भांडलो किती रडलो किती ,
हाय तिच्यामध्ये...!
मारल्या थापा कित्येक ,
थोरा मोठ्यांना ,
आज आणि मारतो थापा ,
बायको-मुलांना ....
संकटात कधी धावून येते ,
मस्तीमध्ये खूप रंगते ,
हातातहात ,पाठीत गुच्च्या ,
कधी गुदगुल्या करते ...!
आयुष्याच्या मध्यान्हाला ,
खूप खूप स्मरते...,
सरते सारे जीवन तरी ,
सरतात सारी नाती जरी,
ही दशांगुल उरते....!
ही मैत्री तर आहे ...
जी आयुष्यभर टिकते ...
आयुष्यभर टिकते ...
आयुष्यभर टिकते...!
