STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

2  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

निशाणा

निशाणा

1 min
182


लक्ष्य तुझ्यासमोर आहे 

चुकवू नको तुझा निशाणा

नेम धरून सोड बाण

जिंकला तरच तू खरा राणा


प्रत्येक वळणावर तुला हीच

भाषा ऐकायला मिळणार आहे

प्रत्येक परीक्षेत तुला हेच

कार्य करावे लागणार आहे


बालपणापासून शिक्षण संपेपर्यंत

पदोपदी यशच मिळवायचं आहे

अपयश कधीच येऊ नये म्हणून

सतत आपला लक्ष्य ठेवायचं आहे


याच दबावाखाली अनेक मुलं

अक्षरशः दबले जात आहेत

दबाव सहन झाले नाही तर 

स्वतःचे जीवन संपवित आहेत


त्यांच्या आवडीनुसार शिकू द्या

यातच खरे त्याचे लक्ष्य असते

हेच कर तेच कर म्हटल्याने

मुलांचे खूपच हाल बहाल होते


मुलांना निशाण्यावर न धरता

त्यांचा निशाणा त्यांना ठरवू द्या

आवडीने अभ्यास करतील अन

आपला आनंद त्यांना मिरवू द्या



Rate this content
Log in