स्वच्छ भारत अभियान.
स्वच्छ भारत अभियान.
प्रारंभ करू स्वच्छतेला।शुभकार्याला।देशकार्याला।दुर्घंधी मुक्त करण्याला।जी जी जी
भारताचे विस्तारीकरण।वसला खेड्यात भारत महान।
स्वच्छतेचा मंत्र कृतीतून।भारत स्वच्छ करुन।जी जी जी
विचार करावा प्रत्येकानं।देश कार्याचे करुन स्मरण।भारतमातेचे फेडावे ऋण।सक्ती स्वच्छतेची अंगी बानूण।जी जी जी
नदी, नाले, गटारे,सरोवर।स्वच्छ करा भारत भर।बालवीरानो लावा हातभार।जगास मंत्र त्रिवार।जी जी जी
स्वच्छ करा खेड्या, खेड्याला।शहरा, शहराला। समुद्र किनार्याला।सुंदर भारत घडवण्याला।जी जी जी
निरोगी जीवन जगण्याला।मानवी जीवन जगण्याला।जग कल्याणाला।आदर्श भारत घडविण्याला।जी जी जी
लाभावे करोडो हात।भारत देशात।थोड्या दिवसात।पूर्ण होईल स्वच्छता देशात।आदर्श दिसावा जगात।जी जी जी
गाडगे बाबांचे थोर विचार।नका पडू द्या विसर।संत तुकड़ोंजींचे क्रांती विचार।राबवा भारतभर।जी जी जी
शाहिर संजय सोनवणे गातो पोवाडयाला।स्वच्छता अभियानाला।पुढील पिढ्याना प्रेरणा देेण्याला।सत्कार्य करण्याला।