प्रीत भ्रमराची
प्रीत भ्रमराची
1 min
159
प्रीत तुझी आगळी गं
फुलावरिस कमळी
भेटायाशी जीव माझा
आतुरला गं जांभळी...........१
गार गार वारा आता
सोस ना गं मजला
तुझ्या प्रिती मंदी खरा
श्वास माझा कोंडला..........२
पशू आणि पक्षी सारे
उड्या मारती स्वच्छंदी
मोगऱ्याचा गंध आज
पेरला गं मना मंदी.........३
कोकीळ ती झाडावरी
करीतसे कुई कुई
स्वच्छंदीतो वारा मंदी
वाहतसे सुई सुई........४
पिंपळाचे पान त्यात
वाजती ते फट फट
नको कोण्या कोल्ह्याची ते
मना मंदी कट कट.........५
खोल तुझ्या मनाची गं
हृदयातील पाकळी
काम धाम सोडूनिया
घेशी कां गं जवळी.........६
