STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

पसारा

पसारा

1 min
213

घरात महिला नसण्याचा

काय परिणाम होतो

घरातील एक सामान

एका जागेवर नसतो


सकाळी लागणारा ब्रश असो

साबणही मिळत नाही मात्र

जागेवर कोणतेच नसते

शोधत राहावे लागते सर्वत्र


झोपण्याची जागा नसते स्वच्छ

सर्व खरकटे अंथरुणावर

अंग पुसलेले ओले कपडे

तसेच पडून राहतात जागेवर


घरात आलेला रोजचा पेपर

नीट नसतो वाचून झाले तरी 

घर नसते कधी घरासारखे

जर बायको नसेल घरी


घर होऊन जाते घाण

सगळीकडे केरकचरा

घरातल्या सर्व भांडीकुंडी

सामानाचा होतो पसारा


साफसफाई स्वच्छता नसल्याने 

घरात सुटतो सगळीकडे वास 

एक क्षण बसावे वाटत नाही

कोंडल्यासारखा वाटतो श्वास


ती घरी असताना बघा कशी

घेते प्रत्येक गोष्टीची काळजी

तिच्या कोणत्याही कष्टाची

आपण घेत नाही काळजी


महिला घरात असल्याची

गोष्टच असते न्यारी

तिच्या येण्याने प्रत्येकाचे

जीवन होते लय भारी


Rate this content
Log in