कोजागिरी
कोजागिरी
शारदीय कोजागिरी
बहरली बाई कशी
नवरात्रीच्या प्रसादे
हर्ष होतसे मनाशी!!१!!
माझ्या मायेच हे दुग्ध
मिळे सोन्याच्या भांड्यात
सारी धडकी ती गेली
माझ्या मनाची उरात!!२!!
मनं चारोळी बारीक
त्याशी बदामाचा शेक
मऊ हळव्या मनुक्या
काजू मध्ये परिपाक!!३!!
कसा आटवीला माये
प्रेम आनंदाचा ठेवा
पुर्ण पौर्णिमेच्या रात्री
गोड करावा तो मेवा!!४!!
द्यावा एकमेका मुखी
घोट प्रेमाचा आनंदे
लक्ष अमृताच्या संगे
चंद्र बरसे प्रेमानंदे!!५!!
घ्यावी त्याची उदारता
करू नये ते कंजुषी
मानवाच्या आयुष्यात
येती सदा रवि शशी!!६!!
कोजागिरी दिनी सांगा
कोण कोण जागे राही
संतदास म्हणे माय
दुग्ध पाडसाला देई!!७!!
