संतांची वाणी
संतांची वाणी
1 min
306
जिथे संतांची वाणी
ती मराठी माय बोली
जिच्या प्रत्येक शब्दात कहाणी
ती मराठी माय बोली
माझ्या महाराष्ट्राची आन
मराठी मायबोली....
जी गाते भक्तीचे गाणे
ती मराठी मायबोली
आदर सत्कार जिचे बोलणे
ती मराठी माय बोली
माझ्या महाराष्ट्राची शान
मराठी माय बोली....
जिच्यात आईची माया
ती मराठी माय बोली
जिच्यात विठ्ठलाची काया
ती मराठी मायबोली
माझ्या महाराष्ट्राची जान
मराठी मायबोली...
संगमच्या लिखाणात भिनली
ती मराठी मायबोली
मी जिला आई मानली
ती मराठी माय बोली
जी आहे माझ्या महाराष्ट्राची गान
ती मराठी मायबोली....
