दिवाळसण
दिवाळसण
1 min
384
तशी प्रत्येक वर्षाची दिवाळी, आमच्यासाठी खास असायची.
आई फक्त फराळ बनवायची, आम्हाला घाई फटाके उडवायची.
शाळेला सुट्टी असायची, म्हणून कोनाला हरकत नसायची.
मोजके चारच दिवस सोडून सगळ्यांची डोकी दुखायची.
सगळे पाहुणे यायचे, मग अशी काय मज्जा यायची.
आम्ही पसरा करायचो, आई फक्त आवरायची.
सण संपत आला की, एक प्रकारे भीती वाटायची.
शाळा पुन्हा भरणार, मनाला धास्ती भरायची.
एवढी करायचो मज्जा की, वर्षभर दरवळायचा वास.
वर्षातून एकदाच यायचा, दिवाळसण खास.
