साईनाथा
साईनाथा
1 min
325
शिर्डीत अवतरूनी साईनाथा
धर्मनिरपेक्षतेची गायली गाथा
देव सर्वांचा आहे एक
संदेश दिला असा नेक
द्वारकामाई स्व हातांनी सजविली
सर्व धर्मांना दारे उघडविली
भिक्षा मागून दारोदारी
गरीबास मदत घरोघरी
जरी दिला कुणी शिव्याशाप
मोठ्या मनाने तुम्ही केले माफ
श्रद्धा सबुरीचे महत्त्व पटविले
स्वच्छता आरोग्याचे धडे गिरविले
श्रीमंत गरीबीची दरी मिटविली
अनंत काळासाठी धुणी पेटविली
पशूपक्षांना दिला निवारा
भक्तांना असतो साईंचा सहारा
शिर्डीचा जसा कडुलिंब गोड
साईंस नाही जगात तोड
जय जय जय साईनाथा
तूच एक साई सर्मथा
