शेवटी
शेवटी
1 min
252
लाभला हा मोकळासा श्वास आता शेवटी
साधला मी साधनेचा योग माझा शेवटी
आज छंदी हा एकांती नाद वेडा भोवती
मी न जाणे ओढ नेशी कोण गावा शेवटी
गान गाता चाललो हा मीच माझा सोबती
भान नाही ध्यान नाही वेड वाटा शेवटी
वाट ओली माखलेली साद घाली आज ही
सोडवूनी पाशसारे स्वैर वारा शेवटी
साथ देइ सांजवेळी काव्य राधा कोवळी
बावरा मी ताल नाचे आनंदाचा शेवटी.