Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mangesh Medhi

Children Stories Inspirational Children

3  

Mangesh Medhi

Children Stories Inspirational Children

किल्ला

किल्ला

1 min
206


आज पुन्हा रमलो बालपणात

बालपणीच्या आठवणीत


मस्त धमाल मस्तीत

पुन्हा लहान होऊन


मुलां सोबत यंदा

परत "किल्ला" बनवण्यात


आज पुन्हा लगबग, धावपळ

दगड विटा मती जमवण्यात


मग सुरु शोधाशोध

कुठला किल्ला कसा बनवायचा

"सिंहगड, रायगड, राजगड"

लोहगड कि विजयदुर्ग


तेंव्हा "फोटो पुस्तके मासिके"

आज आहे "गुगल युट्यूब !"


सगळ बघुन झाल्यावर मात्र

सुरुवात केली रचायला

अन घडला तो वेगळाच

ठरवला तो नाही कुठलाच

किल्ला आमचा नवा आगळाच

दरवेळीचाच घोळ


तरीही झाला मात्र जबरदस्त

मजबुत कणखर दणदणीत


कोण म्हणे मोहरी टाकू

कोण म्हणे गहू

नाही रे हळीव टाकू हळीव

काय ती गडबड गोंधळ


नंतर चित्रांची जमवा जमव

जुने मावळे आहेत का ?

किती चांगले ? किती फुटले तुटले ?

आता नवे काय किती आणायचे ?


अजुन संपले कुठ सगळ

काम थोड ए का आम्हाला !


मावळे मांडायचे, दिवे, माळा लावयच्या

रंग रांगोळी झेंडा सजावट राहीली ना !


आज पुन्हा अनुभवली ती

सगळी मज्जा तो आनंद

आपला किल्ला उभारण्याच

समाधान ती जीत


Rate this content
Log in