मतदान
मतदान
1 min
334
आई माई ताई अन अक्का
विचार करा एकदा पक्का
एकमेकांना जागृत करुनी
मतदानाचा वाढवा टक्का
भारताचा अन आणि बाण
लोकशाहीचा आहे प्राण
त्याला बळकट करण्यासाठी
न चुकता करावं मतदान
एकदाच तलाव भरत नसते
थेंबा थेंबाने तळे बनत असते
आपल्या एका एका मताने
मतदानाची टक्केवारी वाढते
एकमेकांना जागृत केल्याने
वाटचाल होईल महा दिशेने
जाणून घेऊ महत्व मताचे
सत्ता पलटते एका मताने
चला उठा आता जागे व्हा
मतदान करण्या सज्ज व्हा
जागरूक नागरिक म्हणून
मतदानाचा हक्क बजावा
