आई जगी सारे
आई जगी सारे
दिसे जगी सारे कर्तव्याचे ओझे
आई तुझ्यात शोधे मी ममतेचे सांंत्वन |
दिसें परि तु अनेकांची ऋणी वारे
आई तुझ्यातच पाहे मी मनाची आठवण ||
कोण म्हणे तुला आधार जगण्याचा
आई म्हणे मी तुला श्वास माझ्या हृदयाचा |
कोण म्हणे जगी सर्वसुखीची आठवण
आई म्हणे मी तुला प्रकाशाचा स्तंभ त्या उदयाचा ||
प्रत्येकाची मनी साठवतो तुझ्या मायेचा स्पर्श
आई प्रत्येक क्षणी आठवतो गं तुझ्या मनाची हर्षवासी |
प्रत्येकाची किमया देते रूप तुला छायेच
आई प्रारंभी करतो सुरवात तुझ्या मायरुप आशावासी ||
शोधही तुझा घेतात तुझ्या विसाव्या खाली
आई आठवतो गं दूरवरही सहवास तुझ्या आत्मयतेचा |
शोधे अनेकांची नजर कैदेतली गंध मायेचा
आई करते अपार सृष्टी तुझ्या पाई
प्रेमत्वाचा ||
मनी करतात सारे जण फुलांचा वर्षाव
आई तुला देतो वचन तुझ्या आनंदी दिवसाच्या |
शोभे उजळूनी सारा थाट नव्या रंगाचा
आई रंगांतुनीही तुला देतो शुभेच्छा भाग्यदाताच्या ||
