पाठीमागे पलटूनी पाने
पाठीमागे पलटूनी पाने
1 min
177
पाठीमागे पाने पलटता
हात कधी घडला
समजलेचं नाही
श्वास कधी उतरला...
शोधत - शोधत गेले
पुन्हा त्या वाटेने
शब्द कधी काळी
झेलला त्या काटेने...
लिहत गेले काही
त्यांना अर्थ न लागला
पाहिले तरी आता
त्याचा गंध ना कळला...
भावना दडपूनी पुन्हा
श्वास तो लिहला
लिहूनही काहीतरी
तुझ्यातुनी सुगंध पाहिला...
आज अचानक हात
पाठीमागे पलटला
अन् पुन्हा उत्तराला
नवा प्रश्न भिडला...
समजलेचं नाही काही
ती मी कशी घडले
पाहुनी ती लेखणी
का प्रश्न पडले...
