प्रेम माझे
प्रेम माझे
1 min
219
प्रेम माझे बोलते मला
प्रीत तुझी छळते पुन्हा
आठवण तुझी येते मला
काय केला एवढा मी गुन्हा...
प्रेम माझे सतावते प्रिया
तत्वाचा गुण माहिती मला
मनातला ओढावा त्या गंधाचा
आता कसा सांगू तो तुला...
प्रेम माझे लिहते तुला
सख्या काय बोलू या प्रेमाला
प्रित तुझी वेडीची प्रिया
देऊ काय उत्तर या जन्माला...
प्रेम माझे वाट पाहते तुझी
का क्षणोक्षणी दडपतो मनी
तुझी चाहूल रडवते प्रिया
स्तब्ध होतो आवाज कानी...
प्रेम माझे तुझ्या दृष्टी
नाही होणार प्रित कोणाच्या हवाली
तुझी माझी असेल प्रीत आठवणीची
आयुष्यभर अशीच राहील प्रेमाची रखवाली...
