एक असह्य रात्र
एक असह्य रात्र
1 min
231
एक असह्य रात्र
मनाशी बोलते
काळोख्याच्या पाखराची
रात्र ती शोधते...
अंधाराचा विरह
तुझ्यातुन घडला
उत्तराच्या शोधापाई
तिथेच तो अडकला...
ती रात्र एक असह्य
काळोख्यातल्या दिशेची
वेदनेने दडपलेल्या
अधुऱ्या आशेची...
आठवते ती रात्र
एका कहाणीची
मनातल्या भितीची
काहुरतेच्या साठवणीची...
सरता - सरेना ती रात्र
अंगावरच्या काटेला
असह्याने दिला शब्द
त्या एका नव्या वाटेला...
असह्य रात्रीतली गोष्ट
कुठेतरी ती बोलते
मनातून परत
त्या प्रश्नाला छळते...
निघूनही ती रात्र
उराशी भिडते
जाणूनही काही
नकळत तिथे ती शोधते...
