हजारो पुस्तकातली मी
हजारो पुस्तकातली मी
दडपलेल्या पुस्तकात स्वप्न पाहते,
पाहिलेल्या स्वप्नातली माझी गोष्ट शोधते !!
शोधुनही न सापडता पुन्हा लिहते,
लिहूनही काही तिथेच पडून राहते !!!
गोष्टी त्या मनाच्या पुस्तकात बोलते,
बोलुनही तो भास तुझ्यातच उतरते !!
उतरुनही सर्व काही लिहता - लिहता थांबते,
थांबुनही वाचताना तुझ्यात हरवते !!!
नकळत पुस्तकाच्या ओठावर येऊनी छळते,
छळुनही ती बोलायला घाबरते !!
घाबरुही मन काही बोलून टाकते,
टाकूनही तो गंध हास्याने सावरते !!!
लाखो विचारांचा धडा गिरवते,
गिरवूनही ते चित्र तिथेच निर्माण करते !!
करूनही सर्व काही पुन्हा प्रश्न पडते,
पडूनही शब्द नव्याने तिथे भरते !!!
हजारो पुस्तकातली मी पाहते,
पाहूनही ते शब्द उत्तरांशी भिडते !!
भिडूनही अनेक जीव धोक्यात टाकते,
टाकूनही पुन्हा हजारांच्या दुनियेत घडते !!!
