पाऊसधारा
पाऊसधारा
ढगांच्या काळोख्याचा प्रकाश
मातीच्या सुगंधात पडला
इंद्रधनुष्याच्या सोबतती
आज मंत्रमुग्ध घडला...!!
गवतांची पाती वाऱ्यांनी
अलगत डोलू लागली
नाचताही मोर या रानी
हिरवळता बहरून गेली...!!
सरवरसरी बरसू लागल्या
अंगणी या पडून पाहिल्या
थेंब - थेंबाची ओंजळ आली
मातीत जणु या विरून गेल्या...!!
डोंगराला वळसा देऊन
येता - येता धावत आल्या
सुवासिक तर्कतेत पुन्हा
मेघ उसळूनी नाचू लागल्या...!!
फुलांना फीका रंग
तुझ्यातुनी दिसू आला
विस्तृत बेरंगातुनी रंग
थेंबाच्यातुनी फुलून गेला...!!
निसर्गाचा हा थेंब नवलायी
ओश्याळू पाहू लागला
पडता भूमीवरून आज
पाऊसधारा बनून गेला...!!
