असं होत राहत आयुष्यात...
असं होत राहत आयुष्यात...
आयुष्य म्हटलं की चालायचं
अडखळत बसलो तरी नाही थांबायचं
मोकळेपणाने जगायच आयुष्यात
उत्तराच्या प्रश्नांसाठी बिनधास्त बोलायचं...
आयुष्य म्हणजे आनंदाचा क्षण असायचाच
आनंदासोबतही दुःखाचा पाझरही झेलायचा
आयुष्य म्हटलं कि चुकायचं
अन् त्यातुनही नवं काहीतरी शिकायचं...
आयुष्य एकदाच पाहायचे असते
मात्र आयुष्यातली संधी नसते गमवायची
होतात निर्माण अनेक गोष्टी प्रश्नांच्या
त्यातुनही स्वाध्यायपुस्तिका बोलण्यातुन असते सोडवायची...
असं होत राहत आयुष्यात
म्हणून भावना नसतात थांबवायच्या
शेवटी थांबलं की संपते
मनमोकळ करायच आणि नव्या गोष्टी शिकायच्या...
