"लपते हे हसू., पुन्हा तुझ्यात...!"
"लपते हे हसू., पुन्हा तुझ्यात...!"
1 min
422
"लपते हे हसू.,
पुन्हा तुझ्यात...!"
दाटून उरलेल्या त्या स्तरात,
भावूक सुकलेल्या त्या उरात..
गुंज भावनेच्या वेड धुंद प्रवासी
मन मोगरा फुलवत नयनी बघते..,
पाहूनही वेड बावरे रंग हिरवळ
तुझ्यात येऊनि मन हे बोलते..
रूपमा हि तुझ्या अभद्राची
गंधहीन स्वराला स्मृतीत स्मरते..,
हास्य हि अनोखी भातुकली
तुझ्यापरी येऊनि ओठात सरते..
अबोल वाटेत राहून मन.,
तुझ्या हास्यात वेचते हर्ष वन..
"लपते हे हसू.,
पुन्हा तुझ्यात...!"
