STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

कोरोना..

कोरोना..

1 min
16

कोरोनाने सांगितले ..

गावावर आपलं घर असावं,

कुठं ही असावं दुनयेवर

आई बापाकडे यावं जावं.


घर, गाडी, धनदौलत

याहून मोठा आहे जीव,

जीवाला असतो घरात थारा

सोन्यासारखा आपला गाव.


आरोग्याचे दिले धडे

स्वच्छता शिकवली कोरोनानं,

जातपात धर्म भेद

द्यावं सारं सोडून माणसानं.


जनावरं खाणारा माणूस

जनावरासारखच वागतोय,

संकटात साथ माणसाला

माणूसच द्यावं लागतंय.


देवळातल्या देवानं ही

करून घेतलंय बंद दार,

जादू, भोंदू, बाबा,साधू

साऱ्यांनी मानली हो हार.


ज्ञान आणि विज्ञान

याचीच गरज आहे जगाला,

अद्दल घडवण्या माणसाला

कोरोना आला रे सांभाळा..


सांभाळा जिवाला

धोका घ्या समजून,

दुनिया आहे संकटात

नका जाऊ माजून...


Rate this content
Log in