STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

माझी आई

माझी आई

1 min
172

डोईवर असे तिच्या

लाकडांचा भारा

ओझे वाहत असे

ती कुटुंबाचा सारा

मोलमजुरी कराया

रोज जाई रानात

आपल्याच पिलाचा

विचार तिच्या मनात

पायात नसे चप्पल

फिरे ती अनवाणी

कष्ट करून मिळवी

अन्न आणि पाणी

तिच्या अंगी कधी

आळस नाही पाहिला 

लेकरासाठीच तीने

आयुष्य आपलं वाहिला

दुःख सारे सोसून

राहिली ती मुकी

तिचे स्वप्न एकच

राहावे लेकरं सुखी

अशीं माझी आई

आहे जगात महान

तिचे ऋण फेडण्या

करू किती मी दान?


Rate this content
Log in