मित्रभेट
मित्रभेट
1 min
280
जर का योग आला
आपल्या सर्व मित्र भेटीचा,
खरंच असेल केवढा
क्षण तो आनंदाचा...
सहकुटुंब एकदा
वाटे सर्व मित्र भेटू,
देऊ घेऊ आनंद
सुख दुःख आपसात वाटू...
जपू मनातून हे
खऱ्या मैत्रिचं नातं
कृष्णसुदामा जरी
नसले कलीयुगात..
मित्र आणि मैत्री
सारे जपून ठेवू..
वाटतंय जे मनात
ते बोललोय भाऊ...
पटतंय आणि जमतंय का
तुम्हीच आता बघा,
भेटीगाठी व्हाव्यात
हृदयात हवी जागा...
जीवनाच्या नव्या वळणावर
सारे एकदा भेटुन घेऊ,
आठवणी आणि आनंद
साठवून ठेऊ..
