गाव
गाव
1 min
99
माझ्या गावाची कथा वेगळी
माझ्या गावाची व्यथा वेगळी
असून सर्व काही नाही वाटते
दिसायला तर सर्वांपेक्षा वेगळी
सुखात नांदती इथे माणसे
भेदभाव नाही कुणाच्या मनी
सुखदुःखात सहभागी होऊन
सहकार्य करती सकल जनी
जातीपातीच्या तोडून भिंती
सण उत्सव करती साजरे
कोणी कोणाच्या आडवं नाही
येथे कोणाला नाही माज रे
नसेल कोणतीच मूळ सुविधा
तरी कोणी कुरकुर करत नाही
मिळेल ती चटणी भाकर खाऊन
जीवन जगती हुरहुर कशाचे नाही
माझ्या गावाची ही परंपरा
जपली आहे संस्कृती म्हणून
देशाची एकता आहे टिकून
असे गाव घ्या जरा पाहून
