खट्याळ बाळी
खट्याळ बाळी
1 min
372
बाळी : आई,आई,माझ्या
पोटात दुखते
बारीकशी कळ
हळूच उठते.
जोडून हात मी
सांगते गं तुला
गोडच औषध
दे गं बाई मला.
आई: उगी उगी बाळी
धीर धर थोडा
प्यायला मी देते
लिंबू नि सोडा.
लगेच बनवते
कारल्याचा काढा.
बाळी: अगं,माझी कळ
आहे साधी खरी
तिला हवी एक
मोठी कॅडबरी
खाता एक वडी
होईन मी बरी.
(आई लाडाने बाळीचा कान
धरते अन् तिला चॉकलेट देते.)