ती
ती
1 min
211
ती हळवी
ती निराळी
ती कोमल
ती जगावेगळी।
कधी आनंदी
कधी दुःखी
कधी समाधानी
कधी सुखी।
कष्टाळू कधी
कधी मायाळू।
कधी शिस्तप्रिय
कधी स्वप्नाळू।
सगळ्यासाठी राबणारी
मनातल ओळखणारी।
स्वताच दुःख लपवून
सगळ्याना आनंदात ठेवणारी।
ती आहे म्हणून
घराला घरपण असत।
शक्ती स्वरूप देवी तिच्यामुळे
घराच मंदिर होत असत।
