विजयादशमी
विजयादशमी
1 min
191
धन्य दिवस सोनियाचा
लेवून निसर्गाचं दान,
भेटूनिया देऊ सर्वांना
आपट्याचं पान...
आपट्याच्या पानाला ग
आज सोन्याचा मान ,
देवूनिया आशिष
आयुष्यात नांदो समाधान...
करू दुर्गुणाचे दहन
वाईटावर चांगल्याचा मान,
जळोनिया व्देष मत्सर
देऊ एकमेका प्रेमाची आन...
स्मरण करू संस्कृतीचे
साकारू नवे जग छान ,
नाती जपू मनामनाची
देऊन दसऱ्याचे वाण..
