STORYMIRROR

Anil Chandak

Others

4  

Anil Chandak

Others

मान शान तिरंग्याची

मान शान तिरंग्याची

1 min
355

आम्ही देशवासी, एका आईची लेकरे!

मनांत तेवते ज्योत, सदा स्वातंत्र्याची!!धृ!!


ज्ञात अज्ञातांनी, प्राण आपले वेचले!

आयुष्य देशाकरिता, पणाला लावले!


नाही लोभ स्वार्थ मनी, भावना त्यागाची!

मनांत तेवते ज्योत सदा स्वातंत्र्याची!!1!!


भाषा, प्रांत, वंश, पंथ जरी ती अनेक!

संविधान, बाबासाहेबांनी, दिले एक!


भेट मिळे आम्हां, प्रजासत्ताक दिनाची!

मनांत तेवते ज्योत, सदा स्वातंत्र्याची!!2!!


मिटला अंधार त्या, घोर पारतंत्र्याचा!

लागे हातभार, बलिदान शहिदांचा!


सत्तरवर्षे, वाटचाल अभिमानाची!

मनांत तेवते ज्योत सदा स्वांतत्र्याची!!3!!


जगातली लोकशाही, बिरूद मिरवी!

भारतमातेची आम्ही, गुण किती गावी!


जाण आम्हांसी ही, हक्क अन् कर्तव्याची!

मनांत तेवते ज्योत, सदा स्वातंत्र्याची !!4!!


वटवृक्ष स्वातंत्र्या, गोड फळे लागली!

साऱ्या जगांत मान, आमची उंचावली!


जपुया मनी आठवण, पारतंत्र्याची!

मनांत तेवते ज्योत सदा स्वातंत्र्याची!!5!!


बालकाच्या हाती, भविष्य भारत भूचे!

ध्येय सदैव जगाच्या, पुढे चालायचे!


मान शान सदैव, टिकवू तिरंग्याची!

मनांत तेवते ज्योत, सदा स्वातंत्र्याची!!6!!


Rate this content
Log in