निवडणूक
निवडणूक
1 min
332
निवडणूक निकाल
निवडणूक निकाल लागण्यापूर्वी
जो तो निकाल लावतो आहे
निवडणूक आपणच जिंकणार
आत्मविश्वासाने बोलतो आहे
निकालापूर्वी असे बोलणे म्हणजे
आपल्या मनाचे समाधान आहे
ज्यांनी पाच वर्षात काम केले
त्यांच्या गळ्यात विजयाचा मान आहे
भावी सरकार कोणाचेही येवो
जनतेला याचे काही नाते नसते
आपला माणूस जिंकून आला
यातच त्यांचा अत्यानंद असते
संविधानाच्या आधारे चालतो देश
म्हणून टिकून आहे लोकशाही
गुप्त मतदान आहे म्हणून अन्यथा
केव्हाच आली असती हुकूमशाही
चला आता वाट पाहू या
मे महिन्याच्या तेवीस तारखेची
कोण जिंकेल ? कोण हरेल ?
पर्वा नाही आपणाला कोणाची
